कोकण

समर्थ भंडारी पतसंस्थेला १६ कोटी ६५ लाखाचा नफा

CD

‘समर्थ भंडारी’ पतसंस्थेस
१६ कोटी ६५ लाखांचा नफा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षाअखेर १६ कोटी ६५ लाख ढोबळ नफा झाला आहे. तरतुदीनंतर संस्थेला रुपये ६ कोटी ८५ लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी दिली.
संस्थेचे कार्यक्षेत्र कोकण विभाग असून, १८ शाखा व २ कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. संस्थेच्या एकूण ठेवी २१९ कोटी ४ लाख झाल्या असून, ठेवीमध्ये ३५ कोटी ८४ लाखांनी वाढ झाली आहे. एकूण कर्जव्यवहार १७६ कोटी १८ लाख असून, कर्जव्यवहारामध्ये ३० कोटी ५६ लाख वाढ झाली आहे. भागभांडवल १२ कोटी ८४ लाख, निधी १६ कोटी ७८ लाख, गुंतवणुका ८३ कोटी ५ लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल २७३ कोटी ९० लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ३९५ कोटी २२ लाख असून, त्यामध्ये गतवर्षीपेक्षा रुपये ६६ कोटी ३९ लाख वाढ झालेली आहे. थकबाकीचे एकूण कर्जाशी प्रमाण केवळ ०.१२ टक्के आहे. ३१ मार्चअखेर एनपीओचे प्रमाण शून्य टक्के आहे. नवीन चार शाखांना परवानगी मिळाली असून, त्या लवकरच सुरू करण्यात येतील असे प्रभाकर आरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT