- rat४p१०.jpg-
२५N५५४४०
भाऊ कार्ले
----
भाऊ कार्ले यांना ‘समरसता’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : मधील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद मोरेश्वर उर्फ भाऊ कार्ले यांना भावना बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांचा राष्ट्रीय समरसता पुरस्कार जाहीर झाला आहे. बहुआयामी, विविध क्षेत्रातील चळवळींच्या माध्यमातून सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते १९८४ पासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी १९ एकांकिका व एक नाटक यांचे लेखन केले आहे. त्यांचे लिखाण सर्व सेन्सॉर संमत असून, एकांकिका पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत त्यांना नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाची २९० पारितोषिके तसेच आठ राज्यस्तरीय व तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. हा सोहळा नाशिक येथे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.