IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

R Ashwin on Mumbai Indians Struggle: मुंबई इंडियन्सला बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला. हा मुंबईचा ८ सामन्यांतील ६ वा पराभव होता. आता उर्वरित ६ पैकी सर्व सामनेही ते जिंकू शकणार नाहीत, असं आर अश्विनने म्हटलं आहे.
R Ashwin on Mumbai Indians Struggle

R Ashwin on Mumbai Indians Struggle

Sakal

Updated on

Mumbai Indians Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) पाचवेळचे विजेत्या मुंबई इंडियन्स संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. नुकताच बुधवारी (२९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हा ८ सामन्यांमधील ६ वा पराभव होता. त्यामुळे मुंबई अद्यापही ४ गुणांसह ९ व्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २४३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून रायन रिकल्टनने १२३ धावांची नाबाद खेळी केली होती. पण ट्रॅव्हिस हेड (७६), अभिषेक शर्मा (४५), हेनरिक क्लासेन (नाबाद ६५) आणि सलील अरोरा (नाबाद ३०) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे हैदराबादने २४४ धावांचे लक्ष्य १८.४ षटकातच पूर्ण केले.

R Ashwin on Mumbai Indians Struggle
Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com