कोकण

इलेव्हन फायटरने पटकावला जय भैरव चषक

CD

rat४p१८.jpg-
२५N५५४५१
रत्नागिरी ः कोळंबे येथे झालेल्या श्रीजय भैरव टी-२० क्रिकेट स्पर्धेचा इलेव्हन फायटर विजेता संघ.
----
इलेव्हन फायटरने पटकावला ‘भैरव’ चषक
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा; सदानंद प्रसाद उपविजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः शहराजवळील कोळंबे येथील मैदानावर २१ ते ३१ मार्च या कालावधीत झालेल्या श्री जय भैरव टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी इलेव्हन फायटर (एडी) संघाने सदानंद प्रसाद क्रिकेट क्लबवर ३३ धावांनी विजय मिळवून ५० हजार व मानाचा व प्रतिष्ठेचा श्री जय भैरव चषकावर यावर्षी नाव कोरले. सामन्यामध्ये नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करताना इलेव्हन फायटर संघाने २० षटकात ७ बाद १४४ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना सदानंद प्रसाद क्रिकेट संघाने २० षट्कात ७ बाद १११ धावा केल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
पारितोषिक वितरणावेळी रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष बाळू उर्फ दत्तात्रय साळवी, सदस्य लाल्याशेठ खातू, प्रयोजक रमेश कसबेकर, सुनील घोसाळकर, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष बशीरभाई मुर्तुझा, ज्येष्ठ क्रिकेटपटू राजीव सावंत, सुभाष पटवर्धन आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे अध्यक्ष व स्पर्धेचे प्रायोजक गजेंद्र पाथरे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. तसेच विजयी, उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंचा चषक देऊन गौरव करण्यात आला. तसेच अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अंकीत मुखर्जी (इलेव्हन फायटर एडी संघ), उत्कृष्ट गोलंदाज पार्थ गांधी (सदानंद प्रसाद संघ), उत्कृष्ट फलंदाज अंकीत मुखर्जी (इलेव्हन फायटर), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहूल झोरे (साई इलेव्हन, लांजा), स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो रूबेनसन परदेशी (सदानंद प्रसाद संघ), मालिकावीर पार्थ गांधी (सदानंद प्रसाद संघ) आदींना गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी गजानन पाथरे, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे दशरथ दाभोळकर, ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक रमेश कसबेकर, शरद मयेकर यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT