नेमळे ब्राह्मण मंदिरात
सोमवारपर्यंत कार्यक्रम
सावंतवाडी, ता. ४ ः नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिरात रामनवमीनिमित्त ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री देव ब्राह्मण मंदिरात ३० मार्चपासून दररोज दुपारी ब्राह्मण भोजन तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम सुरु आहे. आज रात्री ९ वाजता प्रसिद्ध हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचे मनोरंजक नाटक पार पडले. याला नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. उत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या रविवारी (ता.६) रामनवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता कीर्तनाचे आयोजन केले असून, दुपारी ठीक १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म सोहळा होणार आहे. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आणि रात्री भजन-कीर्तनाच्या कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाच्या सांगता समारंभाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता.७) खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक आयोजित केले आहे. श्री देव ब्राह्मण कला क्रीडा मंडळ गावकर कुंभारवाडी मित्र मंडळ, नेमळे मानकरी आणि सर्व ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आग्रहाचे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनवमीचा हा उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------------
सावंतवाडीत उद्या
रामनवमी महोत्सव
सावंतवाडी ः आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडी येथे दरवर्षीप्रमाणे श्री रामनवमी महोत्सव रविवारी (ता.६) हरेकृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी येथे साजरा केला जाणार आहे. होणारे कार्यक्रम असे ः रविवारी (ता.६) सकाळी साडेनऊ ते बारा वाजता श्री राम कथा (कथाकार डॉ. राम मिस्त्री), दुपारी १२ ते १२:३० आरती व दुपारी १२:३० नंतर सर्वांसाठी महाप्रसाद, सायंकाळी चार ते सहा या वेळेत सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा गीत रामायण कार्यक्रम, सायंकाळी सहा ते सात या वेळेत भजन. सर्वांनी या दिव्य कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडीतर्फे केले आहे.
---
विलवडेत आज
दशावतारी नाटक
ओटवणे ः विलवडे आशीर्वाद वड येथे सालाबादप्रमाणे उद्या (ता.५) रात्री १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (नेरूर) यांचा ‘जय जय रवळनाथ’ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी उपसभापती विनायक दळवी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.