55463
पाककला स्पर्धेत गौरी गावडे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्यावतीने पाककला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सौ. गौरी गणेश गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
श्री गावडे काका महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष एकनाथ गावडे, विश्वस्त गौरव मुंज, दत्तात्रय किनळेकर, सौ. प्रिती कुशे, सौ. केसर वानीवडेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रसन्न कोदे व गौरव मुंज यांनी केले. यावेळी श्री. गावडेकाका म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. आपले कुटुंब सुखी समाधानी होण्यासाठी स्त्री झटत असते. ती एक चांगली गृहिणी, सुग्रीण असते. तिच्या सुप्त गुणांना अशा स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर वाव मिळतो, प्रोत्साहन मिळते. कोकणात येणाऱ्या पर्यटकाला कोकणचे महत्व व कोकणी मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी आपण या स्पर्धेत फणस व त्यापासून बनविलेले हे पदार्थ आपणाकडून बनवून घेऊन या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न करू.’’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. गौरी गावडे (फणसाचे धोंडस), द्वितीय ईशान किनळेकर (बनाना स्मुदी), तृतीय सौ. स्वाती सुतार (केळ्याचे अप्पे), उत्तेजनार्थ सौ. प्रतिभा कोरगावकर (खापरोळी) यांनी मिळविला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता.६) दुपारी११.३० वाजता आयोजीत केला आहे. राकेश केसरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.