कोकण

मनसे पदाधिकाऱ्यांचा परप्रांतीय बॅंकांना दणका

CD

-rat४p२४.jpg-
२५N५५४७७
चिपळूण ः तामिळनाडू बँकेच्या व्यवस्थापनाला मराठी फलक लावण्याचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे आणि पदाधिकारी.
-----
‘मनसे’चा परप्रांतीय बॅंकांना दणका
मराठी भाषेत फलक लावण्याच्या सूचना ; आठ दिवसांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः मनसैनिकांनी शहरातील परप्रांतीय भाषीय बॅंकांना मराठीचा चांगलाच दणका दिला. मराठी भाषेचा वापर करा, माहितीफलक मराठीत लिहा अन्यथा मराठी भाषा शिकवावी लागेल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला. या वेळी मनसैनिकांनी बँकेतील इंग्रजी भाषेतील पोस्टर काढून टाकत आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर इथे येऊन मराठीचा धडा शिकवा, असा इशारा देण्यात आला.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा जागर केला. महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, असा आग्रह धरला असून मनसैनिकांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे याच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी बॅंकाना जोरदार दणका दिला. शहरातील राष्ट्रीयकृत बँका आणि संगणक प्रशिक्षण केंद्र अशा अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे याच्या नेतृत्वाखाली तालुका सचिव संदेश साळवी, शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, उपशहराध्यक्ष सनी शेलार, विभाग अध्यक्ष नितीन गोवळकर, विभाग अध्यक्ष अतिश भांड आदी मनसैनिकांनी तामिळनाडू बँकेत जाऊन बँक मॅनेजर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या ठिकाणी सर्व कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. त्यांना मराठी भाषा कळत नाही. या ठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर इंग्रजी भाषेत होती. मनसैनिकांनी ती काढून टाकली. उपस्थित ग्राहकांनीही मराठी भाषा यांना कळत नाही आणि आम्हाला त्यांची भाषा कळत नाही. राज ठाकरेंनी चांगला निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष नलावडे यांनी येत्या आठ दिवसात मराठी भाषेचा वापर आणि मराठीमध्ये माहितीफलक जर लागले नाहीत तर याद राखा, पुन्हा येऊन मराठी शिकवावी लागेल असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT