देवगडमध्ये मंगळवारी
सरपंच आरक्षण सोडत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (चिठ्या टाकून) निश्चित केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.
ग्रामपंचायत अधिनियम सुधारणेनुसार शासनाने सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी निश्चित केल्या आहेत. या निवडणूक नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी व महिला सरपंच पद आरक्षित करावयाचे आहे. त्यानुसार तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित पदे २, महिलांसाठी पदे २, अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे ०, महिलांसाठी पद १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे १०, महिलांसाठी पदे १० व खुला प्रवर्गामध्ये पदे २३, महिलांसाठी पदे २४ अशाप्रकारे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार आहे. तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नोंद घेऊन सोडत कार्यक्रमावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार श्री. पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.