55483
उद्योजिका निलम राणेंचा
माड्याचीवाडीत सत्कार
कुडाळ, ता. ४ ः तालुक्यातील माड्याचीवाडी येथील गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्वामी मंदिर कलश पुजन मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. याचे औचित्य साधून खासदार नारायण राणे यांच्या पत्नी उद्योजिका सौ. निलम राणे यांनी भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास या संस्थेच्या विश्वस्त सौ. प्रीती कुशे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सौ. केसरकर-वानीवडेकर, सरपंच विघ्नेश गावडे उपस्थित होते. यावेळी सौ. राणे यांनी गावडेकाका महाराजांनी हे सुंदर स्वामी मंदीर या छोट्याशा गावात निर्माण करून हा संपूर्ण परिसर भक्तीमय केलेला आहे, असे सांगत संपूर्ण राणे कुटुंब सिंधुदुर्गातील जनतेची सेवा करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश केसरकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.