कोकण

जिल्हा रुग्णालयात ऑटीझम दिन

CD

जिल्हा रुग्णालयात
ऑटिझम दिन
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील डिईआयसी विभागामार्फत जागतिक ऑटिझम दिन झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, यांनी डिईआयसी कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवाबाबत, तर श्रीमती मनीषा कर्चे यांनी ऑटिझम दिनाच्या अनुषंगाने विस्तृत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डिईआयसी स्टाफ विक्रम कांबळे, डॉ. अनुराधा बांदिवडेकर, श्रीमती ॲजेला रॉड्रिक्स, केतन कदम, श्रीमती लोचन चिंदरकर, श्रीमती मनीषा कर्चे, श्रीमती शलाका राणे, संतोष देसाई, रोहन वारंग, ओमकार ठाकूर, तसेच पालक व बालके उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक केतन कदम यांनी केले. बालकांच्या हस्ते केक कापून ऑटिझम दिन साजरा करण्यात आला. लहान मुलांसाठी चित्र रंगवणे तसेच इतर खेळ घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांनी दिली.
----
नेत्रदानासाठी
जनतेला आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२४-२०२५ मध्ये ५ व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन जनतेने नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
नेत्रदान हे दृष्टिहिनांच्या जीवनात दिवा लावण्यासारखे आहे. तुमचे डोळे दान केल्याने इतर कोणाला तुमच्या डोळ्यांद्वारे जग पाहण्याची परवानगी मिळते, जगाचे सौंदर्य आणि आश्चर्य वाटून घेता येते. आपले डोळे दान केल्याने अंध व्यक्तीला उज्‍ज्‍वल भविष्याची आशा मिळते, ज्यांची दृष्टी केली आहे, त्यांना नेत्रदान ही दुसरी संधी देते.
---
उद्योगमंत्री सामंत
आज सिंधुदुर्गात
सिंधुदुर्गनगरी ः उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत उद्या (ता.५) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा असा ः
दुपारी २.१५ वाजता हेलिकॉप्टरने पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठक. (स्थळ - शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई-गोवा हायवे, पावशी कुडाळ, जि.सिंधुदुर्ग). दुपारी ४ वाजता कुडाळ येथून मोटारीने राधानगरीकडे (जि. कोल्हापूर) प्रयाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT