59882
किंजवडेत पावणाई मंदिराचा
१ मेपासून जीर्णोद्धार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः किंजवडे (ता.देवगड) गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणादेवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा १ ते ३ मे या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
होणारे कार्यक्रम असे ः जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यात २९ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता कलश व मूर्ती मिरवणुकीचा सोहळा, १ मे सकाळी ८ वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता आवाहन पूजन, वास्तू होम व आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजेपर्यंत भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई बुवा प्रमोद हर्याण आणि प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई बुवा प्रमोद धुरी यांचा पारंपरिक डबलबारी भजन सामना, २ मेस सकाळी ८ वाजता कलशारोहण सोहळा, धार्मिक विधी व आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थानिक भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा, ३ मेस सकाळी ८ वाजता आवाहित देवता पूजन, कुंकुमार्चन, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थानिक भजने, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ८ वाजता बक्षीस वितरण समारंभ, रात्री १० वाजता राठीवडे सुतारवाडी येथील श्री विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग. उपस्थित राहावे, असे आवाहन परबवाडी ऐक्यवर्धक मंडळ, किंजवडे आणि मुंबई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.