Why Mumbai-Goa Highway work is delayed
esakal
संगमेश्वर (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासीयांसह वाहनचालक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत (Mumbai-Goa Highway four-laning project delay) आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असे संकेत दिले होते; मात्र, प्रत्यक्ष मे महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी काम अत्यंत संथगतीने सुरू असून, हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.