

Shubman Gill - Suryakumar Yadav
Sakal
Asian Games Cricket India, Marathi News: आशियाई क्रीडा स्पर्धा यावर्षी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जपानमधील आयची-नागोया येथे होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश असून माजी सुवर्णपदक विजेता भारतीय संघही (Team India) सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी आता बीसीसीआयने IOA ला भारतीय संघातील संभाव्य ३० खेळाडूंची यादी सुपूर्द केली आहे.
मात्र यामध्ये भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांचे नाव या ३० जणांच्या संभाव्य संघात नाही. या स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेट सामने २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान होईल.