-rat२५p२८.jpg
59898
रत्नागिरी ः भाट्ये समुद्रकिनारी रेतीतून वाट काढत काढत कासवांची पिले पाण्यावर स्वार झाली.
समुद्रात झेपावली कासवाची १०६ पिले
भाट्येत घरटी संवर्धन मोहीम; तुलनेत यावर्षी जास्त घरटी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : शहरानजीक भाट्ये येथे राबवण्यात आलेल्या कासव घरटी संवर्धन मोहिमेंतर्गत गुरुवारी १०६ पिले समुद्रात सोडण्यात आली. वन विभाग कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली भाट्ये येथे गतवर्षीपासून ही कासव घरटे संरक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कासवांच्या घरट्यांमध्ये वाढ झाली आहे.
भाट्ये येथील कासवमित्र समीर भाटकर यांच्या माध्यमातून कासव संवर्धन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वन विभाग व कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. गतवर्षीही भाट्येकिनारी कासवांची घरटी सापडली होती. त्यांचे संवर्धन करण्यात आले होते. यावर्षीही झरी विनायक मंदिरानजीक कासव संधर्वन प्रकल्प राबवण्यात आला आहे. कासवाच्या अंड्यांचे माणसांकडून किंवा कोल्हे, कुत्री यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यापूर्वी ३५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. यावेळी १४४ अंड्यांमधून १०६ पिले काल सकाळी समुद्रात सोडण्यात आली. यावेळी सरपंच प्रीती भाटकर, माजी सरपंच पराग भाटकर, उपसरपंच राजेश पाटील, कासवमित्र समीर भाटकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही पिले समुद्रात सोडण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.