कोकण

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण

CD

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण
पावसाची शक्यता ; आंबा बागायतदारांची चिंता वाढली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः गेली दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. हंगामाच्या ऐन टप्प्यात पाऊस झाला तर हापूसवर करप्याचे काळे डाग पडण्याची भीती आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन बागायतदारांकडून आंबा काढणीवर भर दिला जात आहे.
गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीने रत्नागिरीतील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत. त्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. या बदलांमुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झालेले आहेत. पावसाची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांची कसरत सुरू झाली आहे. पाऊस पडलाच तर हापूसवर करपा रोगाचे प्रादुर्भाव होऊन फळावर काळे डाग पडू शकतात तसेच पाऊस पडून गेल्यानंतर हवेत उष्मा वाढल्याने फळं भाजून गळून जाण्याची भीतीही असते. यंदा आंबा कमी असल्याने हंगाम जास्तीत जास्त १० मेपर्यंतच राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दोन दिवसात पाऊस पडलाच तर बागायतदारांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. वातावरणाचा अंदाज घेऊन अनेक बागायतदारांनी तयार झालेला आंबा तत्काळ काढून बाजारात पाठवण्याची घाई सुरू केली आहे. सध्या बाजारातील हापूसची आवक वाढल्याने १८०० ते २८०० रूपये पेटीएवढे दर आहेत.
दरम्यान, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २६ व २७ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या लखलखाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे; मात्र २८ ते ३० एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील. अधूनमधून अंशतः ढगाळ राहू शकते तसेच या कालावधीत कमाल तापमान ३५.३ डीग्री सेल्सिअसएवढे असते तरी यावर्षी ते ३५.२ डीग्री सेल्सिअसएवढे असण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान २३.९ डीग्री सेल्सिअसवरून २४.५ डीग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-----
कोट
यंदाचा आंबा हंगाम संपुष्टात येऊ लागलेला आहे. आता फळं काढणीयोग्य झालेली आहेत. त्यामुळे पाऊस पडला तरच त्याचा परिणाम होऊ शकतो; मात्र हवामान बदलामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे.

- मकरंद काणे, आंबा बागायतदार
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT