- rat२५p५.jpg
59789
दापोली ः दाभोळ समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात आलेली एलईडी नौका.
एलईडी पुरवणाऱ्या नौकेवर कारवाई
मत्स्य व्यवसाय विभाग; दाभोळ समुद्रात दोन तांडेल, खलाशी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २६ ः तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात मासेमारी नौकांना एलईडी लाईट पुरवणाऱ्या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गुरुवारी (ता. २४) रात्री कारवाई करण्यात आली आहे. त्या नौकेवरील दोन तांडेल आणि दोन खलाशी होते.
मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांच्या निर्देशानुसार, अनधिकृत आणि विजेच्या प्रखर प्रकाशाचा (एलईडी) उपयोग करून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्य विभागाने गुरुवारी (ता. २४) रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास बुरोंडी किनाऱ्यासमोर ११.५ सागरी मैलांवर मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधीक्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांची नौका साबीर ही महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात एलईडी लाईटचा वापर करताना आढळली. या नौकेवर तांडेलसह २ खलाशी होते. नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळी आढळलेली नाही. नौकेवरील विजेचे उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुवेस्कर आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सागरीसुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षारक्षक व गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.