60007
सावंतवाडी ‘महसूल’चे काम स्तुत्य
बबन राणे ः इन्सुलीत ‘समाधान’ शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना घेता आला पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यात महसूल विभागाचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केले.
महसूल विभागातर्फे आयोजित क्षेत्रफळ मंडलमधील सर्व ग्रामस्थांसाठी इन्सुलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी श्री. राणे बोलत होते. व्यासपीठावर इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, इन्सुली उपसरपंच वर्षा सावंत, माजी सभापती मानसी धुरी, पंच सदस्य सोनाली मेस्त्री, स्वागत नाटेकर, नमिता नाईक, रामचंद्र चराटकर, क्षेत्रफळ मंडल अधिकारी मालवणकर, इन्सुली तलाठी भक्ती सावंत, रघुवीर देऊलकर, पोलिसपाटील जागृती गावडे आदी उपस्थित होते. या शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंडल अधिकारी मालवणकर यांनी विविध योजना, जातींचे दाखले, फार्मर आयडी आदींबाबत माहिती दिली. तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेत शंकांचे निरसन केले. तलाठी भक्ती सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.