60008
पालकमंत्री राणे यांची
परब यांनी घेतली भेट
वेंगुर्ले, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री नीतेश राणे यांची नवनिर्वाचित भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांनी भेट घेतली. यावेळी मंत्री राणे यांनी परब यांना शुभेच्छा देताना तालुक्यात भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करा, असे सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, सायमन आल्मेडा, मारुती दोडशनट्टी आदी उपस्थित होते.
................
60009
बांदेश्वर मंदिर कलशारोहण
वर्धापन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त हजारो भाविकांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. ‘हर हर सांब सदाशिव’च्या गजराने सर्व वातावरण शिवमय झाले. या सोहळ्यानिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
सकाळी श्री गणपती पूजन, देवतांस नारळ, विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे झाले. त्यानंतर श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्राभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान आदी विविध धार्मिक विधी पुरोहितांकरवी करण्यात आले. दुपारी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी स्थानिक मंडळांची भजने व युवा कीर्तनकार विनीत महाराज म्हात्रे (डोंबिवली) यांचे कीर्तन, रात्री श्रींचा पालखी सोहळा आदी कार्यक्रम पार पडले. भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.