कोकण

बाजारपेठेमध्ये रस्ता खोदाई

CD

संगमेश्वर बाजारपेठेत रस्ता खोदाई
खासगी कंपनीकडून काम ; ग्रामस्थांकडून संताप
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः संगमेश्वर बाजारपेठेमध्ये काँक्रिट रस्ता खोदून खासगी कंपनीकडून अचानक पाईप टाकण्याचे काम सुरू केल्याने संगमेश्वरवासियांनी संताप व्यक्त केला आहे.
संगमेश्वर बाजारपेठ शुक्रवारी बंद असते. बंद बाजारपेठेचा फायदा उठवत अचानक खासगी कंपनीकडून पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम करत असताना ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने पाण्याची लाईन तसेच काँक्रिटीकरण रस्ता खड्डेमय झाला आहे. संगमेश्वर बाजारपेठ नागरी सुविधा अभाव व दिवसेंदिवस घटत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे हवालदिल झाली आहे. खूप वर्षांनी संगमेश्वर बाजारपेठेत सिंमेट काँक्रिटचा रस्ता झाला. कंपनीकडून रस्ता खोदून काम सुरू केल्याने काँक्रिटीकरण रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, हा रस्ता पुन्हा काँक्रिटीकरण करणार का? असा प्रश्न संगमेश्वरवासीय विचारत आहेत. संगमेश्वर येथील प्रसिद्ध निनावे देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोमवारी प्रारंभ होत आहे, असे असताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हे काम सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT