60028
मदर क्विन्स स्कूलमध्ये ज्ञानरंजक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच कृतियुक्त अध्ययनातून नवीन, आनंददायी अध्ययन अनुभव घेण्यासाठी १५ ते २५ एप्रिलपर्यंत विविध शैक्षणिक व ज्ञानरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये चित्रकला, कोलाज, कागदकाम, पेंटिंग, मनोरंजक व पारंपरिक खेळ, डंबेल्स कवायत, फिंगर थम पेंटिंग, कराओकेच्या तालावर गायन, भाषा विषयक क्षमता वाढवणारे उपक्रम, पुस्तक वाचन, क्लासिकल डान्स, प्रथमोपचार मार्गदर्शन, मैदानी खेळ, मानसिक एकाग्रता वाढवणारे खेळ आदी विविध उपक्रमांचा समावेश होता. सिया धोपेश्वर यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे मार्गदर्शन केले. पहिली ते आठवीच्या मुलांनी नृत्य कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी लक्षवेधी नृत्याविष्कार व कराओकेच्या तालावर गीत गायनही केले. व्यासपीठावर संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, नृत्य विशारद नृत्यांगना सीया धोपेश्वर, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदी उपस्थित होते. सहशिक्षिका प्रेरणा भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.