कोकण

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर

CD

60043

कलातपस्वी आप्पा काणेकर
ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर

कणकवली, ता. २६ : येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना राणे, मालवणी भाषा पुरस्कार दादा मडकईकर, साहित्य कला पुरस्कार प्रमोद कोयंडे, व्यक्तिमत्व विकास प्रेरणा पुरस्कार सदाशिव पांचाळ, समाजभूषण पुरस्कार सागर शिंदे यांना देण्यात येणार आहे. २ मे रोजी पुरस्कारांचे कणकवलीत वितरण होणार आहे.
अन्य पुरस्कार असे ः उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार नेहा राणे, कोल्हापूर येथील श्रीमती नम्रता इंगळे कांदळकर यांना हिरकणी प्रेरणा पुरस्कार, नेरूर येथील दशावतारी कलावंत सिद्धेश सुधीर कलिंगण यांनाही लोककलेसाठी पुरस्कार, रांगोळीकार आणि कलाशिक्षक समीर चांदरकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट तबलावादक गिरीश कामत, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, लोककला सेवक प्रा. हरिभाऊ भिसे, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते संदेश रावले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ २ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कणकवली नगरवाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट आदी उपस्थित राहणार असल्‍याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Relationship Tips : जोडीदाराने नेहमी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यावी असं वाटतं ना? मग नात्यात अजिबात करू नका 'या' 3 चुका

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

SCROLL FOR NEXT