कोकण

कणकवलीत मंगळवारी जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा

CD

कणकवलीत मंगळवारी
जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा
कणकवली ः जोश बेवरटेक लि. कंपनी पुरस्कृत मे. चेतना ट्रेडर्स, मालवण - कट्टा व कणकवली येथील श्री चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. २९) येथील लक्ष्मी विष्णू हॉल येथे जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व चषक देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत १८ वर्षांखालील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आपली नावे २७ एप्रिलपर्यंत श्रीकृष्ण आडेलकर यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
......................
स्वरा, यथार्थ गवसचे
गुरुकुल परीक्षेत यश
मडुरा ः गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरतर्फे घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत (जीटीएस) २०२४-२५ मध्ये मडुर शाळा नं. २ ची पहिलीमधील विद्यार्थिनी स्वरा गावडे व वाफोली शाळा नं. १ चा पहिलीतील विद्यार्थी यथार्थ गवस यांनी गणित विषयात यश मिळवले. स्वरा गावडे हिने जिल्ह्यात पाचवा, तर राज्यात दहावा क्रमांक मिळवत गणित विषयात ८२ टक्के गुण मिळवले. तर यथार्थ गवस याने गणित विषयात जिल्ह्यात व राज्यात पंधरावा क्रमांक मिळवत ७२ टक्के गुण मिळविले. सावंतवाडी तालुक्यातील दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच इतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यशाबद्दल कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT