कोकण

वाचनाभिमुख उपक्रमांसाठी सहकार्य

CD

60074

वाचनाभिमुख उपक्रमांसाठी सहकार्य

जेरान फर्नांडिस ः आचरा वाचनालयात ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २६ ः वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रामेश्वर वाचनालय चालवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. यासाठी आचरा ग्रामपंचायतीचे नेहमी सहकार्य राहील, असे प्रतिपादन आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांनी रामेश्वर वाचन मंदिर येथे केले. श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन आणि प्रिंटर प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पी. जी. कदम, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, उर्मिला सांबारी, वैशाली सांबारी, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, विलास आचरेकर, पंच सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंदू कदम, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब आदी उपस्थित होते.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. यात कथा, कादंबरी, बालसाहित्य, संदर्भ व इतर प्रकारच्या पुस्तकांचा समावेश होता. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आचरा ग्रामपंचायतीने संस्थेच्या मागणीनुसार लीगल साईज प्रिंटर संस्थेस देणगीदाखल दिला. ‘पुस्तक दिनाचे महत्त्व’ या विषयावर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या उर्मिला सांबारी यांनी मत मांडले. आचरा ग्रामसेवक कदम व आचरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका मधुरा माणगावकर यांनीही वाचनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी वाचनाचे महत्त्व तसेच आचरा ग्रामपंचायतीला संस्थेच्या अपुऱ्या जागेबद्दल माहिती देऊन संस्थेच्या विस्तारित इमारतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT