कोकण

ःबनावट दागिने ठेवून घेतले २ लाख ९० हजाराचे कर्ज

CD

बनावट दागिने तारण ठेऊन कर्जाची उचल
महिलेसह दोघांचा प्रताप ; पतसंस्थेस २ लाख ९० हजारांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २६ ः चिपळूण येथील समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत खोटे दागिने ठेवून त्यावर २ लाख ९० हजार रुपयांचे सोनेतारण कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या एका महिलेविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत २५ एप्रिलला दुपारी वनिता सुरेश केळकर असे ओळखपत्र घेऊन एक महिला एका व्यक्तीसह दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी गेली होती. तिने आणलेले दागिने पतसंस्थेच्या अधिकृत सराफांनी तपासून ते सोन्याचेच असल्याचा अहवाल दिला. ते जिन्नस तारण ठेवून तिला २ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज या पतसंस्थेकडून देण्यात आले. कर्जाची रक्कम घेऊन ती महिला पतसंस्थेतून निघून गेली. त्यानंतर याच पतसंस्थेच्या हर्णै येथील शाखेमध्ये ती पुन्हा सोनेतारण कर्ज घेण्यासाठी गेली. त्यासाठी तिने तिचे ओळखपत्र दिले. त्यावर सुनीता नरेश तवसाळकर असे नाव होते व पत्ता पाळंदे असा होता. कागदपत्र तपासणारा कर्मचारीही पाळंदे येथील होता. त्याने त्या महिलेला तुम्ही पाळंदे येथे कोठे राहता? असे विचारले. या महिलेने विठ्ठल मंदिरामागे आपण राहात असल्याचे त्याला सांगितले; मात्र तिचा संशय आल्याने त्या कर्मचाऱ्याने याच पतसंस्थेच्या दापोली शाखेत कार्यरत असलेला व पाळंदे हेच गाव असलेल्या कर्मचाऱ्याला फोन केला व त्याला या महिलेचे ओळखपत्र पाठवून ती पाळंदे येथील आहे का? अशी विचारणा केली. त्या कर्मचाऱ्याने त्या महिलेचा फोटो पाहिला, त्याच महिलेने काही वेळापूर्वी दापोली शाखेतून वेगळे नाव व पत्ता देऊन सोनेतारण कर्ज घेतले होते. त्यामुळे शंका आल्याने या महिलेने दापोली शाखेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सोनाराला बोलावून पुन्हा तपासणी केली. ते खोटे असल्याचे आढळले. त्यानंतर काही काळ हर्णै शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हर्णै शाखेतच दागिने तपासायचे असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते; मात्र त्या महिलेला संशय आला व तिने हर्णै शाखेतून पोबारा केला; मात्र तिच्यासोबत आलेल्या एका अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेऊन दापोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
या प्रकरणी पतसंस्थेच्या दापोली शाखा व्यवस्थापक यांनी दापोली पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे; मात्र हर्णै येथील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सावधगिरी दाखवल्याने त्यांचे होणारे नुकसान टळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT