‘त्या’ भाजी विक्रेत्यावर
अखेर गुन्हा दाखल
सावंतवाडी, ता. २६ ः पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर ठोकलेला पाकिस्तानचा ध्वज काढून तो गुंडाळून दुकानात नेऊन लपवून ठेवणाऱ्या एका विक्रेत्याला हिंदू संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत राष्ट्रीय एकोप्यास बाधक कृत्य करून देशप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी ठपका ठेवत संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये संशयिताने पाकिस्तानचा ध्वज गुंडाळून आपल्या दुकानात नेऊन लपवून ठेवल्याने एक प्रकारे काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करत देशप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकोपा टिकवण्यास बाधक कृत्य करत सार्वजनिक शांतता बिघडवली असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.