60093
मत्स्य विक्रेत्याचा मृतदेह
सावंतवाडीत घरात आढळला
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः शहरातील माठेवाडा येथील घरातील बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (वय ४५) यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज सकाळी निदर्शनास आली. याबाबतची फिर्याद मुलगा नीतेश तारी यांनी दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृत तारी हे गेली कित्येक वर्षे सावंतवाडी शहरातील मच्छीमार्केट येथे मासे विक्रीचा व्यवसाय करत होते. ते मूळ शिरोडा येथील आहेत. प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर आठवडाभरापूर्वी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले होते. ते व त्यांचे बंधू असे दोघे माठेवाडा येथील घरात राहत होते, तर मुलगा नीतेश हा सालईवाडा येथे दुसऱ्या घरात राहत होता. तारी यांचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेल्याने ते घरात एकटेच होते. दोन दिवस झाले तरी ते मच्छी मार्केटमध्ये आले नसल्याने मुलगा नीतेश याने चौकशी केली. यावेळी ते राहत्या घरातील बंद खोलीत मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलिस हवालदार गुरुनाथ नाईक, पवन परब, महेश जाधव आदींनी भेट देत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. आजारपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.