कोकण

''कार्डियॉलॉजी'' सुविधेचा लाभ घ्या

CD

swt84.jpg
62531
कुडाळः डॉ. जी. टी. राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत योजना उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील. डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. जी. टी. राणे, डॉ. सई राणे, डॉ. सई धुरी, डॉ. निखिल सोनटक्के. डॉ. अभय सावंत आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

‘कार्डियॉलॉजी’ सुविधेचा लाभ घ्या
जिल्हाधिकारी पाटीलः कुडाळात डॉ. राणे हॉस्पिटलमध्ये सुविधा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी कुडाळमध्ये शासनाच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजने अंतर्गतची सुविधा डॉ. जी. टी. राणे यांच्या राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या अनुषंगाने शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना आहेत. या योजनेअंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत हिंदू कॉलनी, कुडाळ येथील राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर या ठिकाणी कार्डियॉलॉजी विभागाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या योजनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी तसेच डॉ. जी. टी. राणे, डॉ. सई राणे, डॉ. अभय सावंत, भूपतसेन सावंत, डॉ. गोरुले व त्यांच्या सोबत जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेची टीम उपस्थित होती.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना कार्यान्वित झाल्या आहेत. ''कार्डियाक'' या सेवेची सुविधा  राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध झाली आहे. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा व आपले आरोग्य सुकर करावे.’’
डॉ. जी. टी. राणे म्हणाले, ‘‘राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर, हिंदू कॉलनी येथे सुरू असलेल्या कॅथलॅबचा लाभ रुग्णांना होत आहे. प्रायमरी अँजिओप्लास्टीसारखी सुविधा सिंधुदुर्गामध्ये मिळणे हे आता या कॅथलॅबमुळे शक्य झाले आहे. हृदयविकार रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ही सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. ही सुविधा सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस असणार आहे. यासाठी गोवा येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. निखिल सोनटक्के उपस्थित राहून रुग्णसेवा देणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT