- rat८p४.jpg ः
२५N६२५१२
संगमेश्वर -प्रारंभिक वर्गाच्या समारोप कार्यक्रमावेळी उपस्थित राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी आणि उपस्थित सहभागी वर्गाची.
---
मुलींच्या सद्गुणांच्या विकासासाठी प्रयत्न
राष्ट्रसेविका समितीचे वर्ग; पाध्ये इंग्लिश स्कूल
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसीय निवासी प्रारंभिक वर्गाची सांगता अरूंधती अरूण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाली. या वर्गामध्ये दक्षिण व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून ५८ बालिका सहभागी झाल्या होत्या. या वर्गाची मध्यवर्ती कल्पना जय जननी जय पुण्यधरा ही होती.
मुलींच्या सद्गुणांचा विकास होण्यासाठी तसेच मन आणि मनगटाचा कणखरपणा वाढावा हा प्रमुख उद्देश या वर्गाच्या आयोजनाचा होता. या निवासी वर्गामध्ये मनगटाच्या बळकटपणासाठी काठी, लेझीम, यष्टी, योगासने इ. प्रकारांबरोबर मन:शक्तीच्या वाढीसाठी विविध महत्वपूर्ण विषयांवरील चर्चासत्र व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक वर्गाचे उद्घाटन राष्ट्रसेविका समितीच्या वर्गाधिकारी सुनंदा आमशेकर, गोवा यांच्या हस्ते संपन्न झाला. या वर्गामध्ये विविध खेळ व कार्यशाळा, बौद्धिक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक व्यायाम, स्वसंरक्षण, मनोरंजन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कागदी फुले, आकर्षक चित्रे, रांगोळी अशा कलाकृतींची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. देशभक्तीपर समूहगीते, प्रार्थना व श्लोक, योगासने व सूर्यनमस्कार, पारंपरिक बैठे व मैदानी खेळ प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आले. या वर्गामधील बौद्धिक सत्रात सुनंदा आमशेकर, उमा दांडेकर, श्रेया सरदेशपांडे, दीपाली कशेळकर, स्मिता आंबेकर यांनी व्याख्यानातून उद्बोधन केले. कागदी फुलांचे, रांगोळी, चित्रकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण अनुक्रमे सेजल वास्कर, सोनाली सुर्वे, तृप्ती सावंत व नयन शिंदे यांनी दिले. या प्राथमिक वर्गासाठी राधिका गानू (मुख्य शिक्षिका), रिद्धी धामणे (सहशिक्षिका), पूर्वा चौगुले, साक्षी शिंदे, तन्वी परांजपे यांनी प्रशिक्षण दिले. या प्रारंभिक वर्गाचा समारोप स्मिता आंबेकर यांच्या व्याख्यानाने झाला. उपस्थितांचे स्वागत नगर शाखा कार्यवाहिका सुमन हेबाळकर यांनी केले तर अहवाल वाचन वर्गाधिकारी सुनंदा आमशेकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.