swt815.jpg
62554
श्री एकमुखी दत्त मंदिर
टेंब्येस्वामी पादुका मंदिर
वर्धापन सोहळा आज
सावंतवाडीः श्री एकमुखी दत्त मंदिर सबनिसवाडा सावंतवाडी येथे उद्या (ता. ९) श्री टेंब्येस्वामी पादुका मंदिरचा १०९ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता एकादशणी, अभिषेक, ९.३० वाजता श्री सत्यदत्त पूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती, १ वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा, आरती व स्थानिक दत्तगुरू भक्तांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.
.................
सावंतवाडीत रविवारी
रक्तदान, नेत्र शिबिर
सावंतवाडीः ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फाउंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता येथील बसस्थानकासमोर काझी शहाबुद्दीन हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात बांबोळी रक्तपेढी रक्त संकलन करणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस आणि सार्थक फाउंडेशनचे संचालक सुदेश नार्वेकर यांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्येष्ठांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...................
गेळे-डुरेवाडीत आज
स्मृतिस्थळ उद्घाटन
आंबोलीः गेळे डुरेवाडी येथे श्री कुलदेवता बंडवसाचा पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या (ता. ९) आयोजित केला आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ७ वाजता बंड परिवार मूळपुरुष (पूर्वज) नूतन स्मृतिस्थळाचे उद्घाटन व पूजन, ९.३० वाजता श्री कुलदेवता प्रतिमांची गावातून सवाद्य मिरवणूक, १० वाजता मंदिरामध्ये प्रतिमांची प्राणप्रतिष्ठापना व होम हवन विधी, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री १० वाजता पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन बंड परिवाराच्या वतीने केले आहे.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.