- rat९p१.jpg-
२५N६२६८१
आडिवरे येथील तावडे भवनाची प्रशस्त वास्तू.
(जाहीरातीजवळ दोन कॉलम घ्यावी)
पर्यटकांचे आकर्षण ठरलेले तावडे भवन क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवनाचा सातवा वर्धापनदिन उद्या (ता. १०) व रविवारी (ता. ११) मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. भवनाच्या आवारात कुलदैवत श्री सप्तकोटेश्वराचे सुरेख मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन उद्या (ता.१०) होणार आहे. तावडे भवनाच्या सात वर्षांच्या वाटचालीविषयी थोडक्यात...
- संतोष तावडे, आर्किटेक्ट, तावडे अतिथी भवन.
---------
पर्यटकांचे आकर्षण ठरलेले तावडे अतिथी भवन
क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाने २०१५ मध्ये तावडे भवनाच्या बांधकामास प्रारंभ केला. आडिवरे येथे दीड एकरवर दहा हजार चौरसफुटांचे बांधकाम, बेसमेंटसह तीनमजली चिऱ्याच्या भिंती, मेंगलोरी कौलांचे छप्पर असलेली ही वास्तू कोणाच्याही नजरेत भरणारी आहे. येथे तावडे यांचे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वराची विशाल मूर्ती स्थानापन्न केली आहे. या ठिकाणी आलिशान असे आठ एसी सूट्स, उद्यान, पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे.
तावडे भवनाला तावडे कुटुंबीय आणि पर्यटकांनी पहिली पसंती दिली आहे. येथे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर असल्यामुळे भवनात फक्त शाकाहारास परवानगी आहे. या ठिकाणी मुंबई, पुणे, कर्नाटक, दिल्ली, कोल्हापूर, सोलापूर यासह युएस, युके, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या परदेशांमधीलही पर्यटक आवर्जून येऊन गेले आहेत. वाड्यात एकाच वेळेस २५० ते ३०० लोकांची बसण्याची व्यवस्था असल्याने मुंज, साखरपुडाही येथे केला जातो. लग्न व इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी शेजारी मोठे स्टेज असून, त्या ठिकाणी १२०० लोक बसतील एवढी सोय आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हा स्पॉट आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. कंपन्यांचे प्रशिक्षण, मान्यवरांच्या बैठका, सेमिनार, वर्कशॉप्सही येथे आयोजित केली जातात.
भवनातील प्रशस्त एका खोलीत एका वेळेस चार ते पाचजणांचे कुटुंब राहू शकते. स्वच्छता, नम्र, तत्पर कर्मचारीवर्ग यामुळे या ठिकाणी पर्यटकांना तत्काळ सेवा मिळते. शुद्ध शाकाहारी व पौष्टिक जेवणालाही पसंती मिळते. देवघळी बीच, श्री कनकादित्य मंदिर, श्री महाकाली देवीमंदिर, स्वामी स्वरूपानंद मंदिर अशा पर्यटनस्थळांच्या नजीक असल्याने तावडे भवनाला पर्यटकांनी पसंती दिली आहे.
---
मान्यवरांच्या भेटीगाठी
तावडे भवनाला अनेक दिग्गजांनी भेट देऊन कौतुक केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भवनास भेट देऊन विशेष कौतुक केले होते तसेच गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन-लघाटे यांचे या भवनात चित्रीकरण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.