कोकण

-चिपळुणात सीएनजीचा तुटवडा

CD

चिपळुणात सीएनजीचा तुटवडा
पर्यटकांसह रिक्षाचालकांना फटका ; दोन किमीपर्यंत रांगा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : तालुक्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सीएनजीच्या वाहनांना बसत आहे. पाचशे रुपयांच्या सीएनजीसाठी रात्री उशिरापर्यंत तर कधी पहाटेची झोपमोड करून पंपावर जावे लागत आहे.
मुंबईहून येताना लोटे, वालोपे येथे प्रत्येकी एक सीएनजी पंप आहे. चिपळूण शहरात दोन आणि संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे एक सीएनजी पंप आहे. या पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी येणाऱ्‍या पर्यटकांनासुद्धा या सीएनजीचा सामना करावा लागत आहे. ज्या पर्यटकांच्या गाड्या सीएनजीवर चालणाऱ्‍या आहेत त्यांना तासनतास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे राहावे लागत आहे. यातच त्यांचा वेळ जात आहे. साधारण पंपावर किमान २ ते ३ किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे ४ ते ५ तास गॅस मिळवायला वेळ लागत आहे. काहीवेळा नंबर येतो; मात्र गॅसच संपतो. यामुळे सर्वच वाहनचालक हैराण झाले आहेत.
---
कोट
जिल्ह्यात विनाअडथळा सीएनजी मिळेल याची कुठेही सोय नाही. पर्यटनासाठी येणाऱ्यांचा निम्मा वेळ सीएनजी पंपावर जातो. आम्ही अर्धा दिवस पंपावर उभे राहिलो तर व्यवसाय कधी करणार आणि चार पैसे कधी कमवणार? शासनाने पंपाची संख्या वाढवावी किंवा आहे त्या पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी.
--मुरलीधर कदम, रिक्षा व्यावसायिक, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT