कोकण

‘एसटी’ फेरी बंद करायची तर पास का दिले?

CD

63209

‘एसटी’ फेरी बंद करायची तर पास का दिले?

प्रवाशांचा प्रश्‍न; तळकट-पणतुर्ली-दोडामार्ग बस अचानक बंद केल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः तळकट-पणतुर्ली-दोडामार्ग ही सकाळची बस सेवा बंद केल्याने तळकट सरपंच सुरेंद्र सावंत यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज बसस्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांना जाब विचारला. बस बंद करायची होती तर विद्यार्थांना पास का दिला, असा सवाल उपस्थित करत बस सुरू न झाल्यास प्रसंगी रस्ता रोखू, असा इशारा देताच उद्यापासून (ता. १३) बस सेवा अर्धा तास अगोदर सुरू करू, अशी ग्वाही राऊळ यांनी दिली.
सावंतवाडी बसस्थानकातून दररोज सुटणारी तळकट-पणतुर्ली-दोडामार्ग बससेवा कोणतेही कारण नसताना अलीकडे बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. कित्येक दिवस ही सेवा बंद असल्याने ग्रामस्थ आणि प्रवाशांमधूनही याबाबतची नाराजी व्यक्त होत होती. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ही एकच बस असल्याने ही सेवा पूर्ववत करा, अशी मागणी तळकट ग्रामपंचायत प्रशासनाकडे लावून धरण्यात आली. याबाबत सरपंच सुरेंद्र सावंत यांनी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधूनही ही सेवा सुरू करण्यात आली नाही. अखेर आज सरपंच सावंत यांच्यासह उपसरपंच रमाकांत गवस, सदस्य शशिकांत राऊळ, अंकुश वेटे, मनोहर झेंडे, मनोज सावंत आदींनी सावंतवाडीत येऊन स्थानक प्रमुख राऊळ यांना जाब विचारला. शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने ही बस सेवा काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आल्याची त्यांनी सांगितले. मात्र, असे असताना शालेय विद्यार्थ्यांना पास का देण्यात आले, असा सवाल सरपंच राऊळ यांनी केला. एकूणच यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासह आर्थिक नुकसानीस एसटी महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ही बस तालुक्याच्या ठिकाणी जाणारी हे एकमेव बस असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग असतो. त्यामुळे ही बसफेरी महत्त्वाची आहे. बस तातडीने सुरू करावी; अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन ‘रास्ता रोको’सारखे आंदोलन हाती घेऊ आणि याची जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला.
--
प्रशासनाकडून मागणीची दखल
अखेर ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्वाही प्रशासनाच्यावतीने स्थानक प्रमुख राऊळ यांनी दिली; मात्र ही बस सावंतवाडी स्थानकातून पूर्वी सव्वासात वाजता सुटायची ती आता पावणेसात वाजता म्हणजेच आपल्याला अगोदर सोडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर ही बस सेवा पूर्ववत म्हणजे सव्वासात वाजता सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये साचले पाणी

Pune Health News : विषाणुजन्य आजारांचा विळखा; पावसाळी वातावरणामुळे तापासह खोकल्याची लक्षणे

Pune Rains : नुकसान झाले असल्यास पंचनामे करा; जितेंद्र डुडी यांचे तहसीलदारांना आदेश

Marathwada Rain: चार दिवसांत सहा मृत्यू; २०५ जनावरे दगावली, मराठवाड्यात तीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची सूचना

Adesh Bandekar: 'लाडके भाऊजी आदेश बांदेकर रंगले हरिनामात'; व्यासपीठावरील सर्व भजनी मंडळी चकीत, श्रोतेही झाले तल्लीन

SCROLL FOR NEXT