कोकण

रत्नागिरी ः जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाची गरज

CD

rat१३p९.jpg-
६३३९५
रत्नागिरी ः जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी सरपंचांचा सन्मान करताना वरिष्ठ भूवैज्ञानिक विजय सोळंखी आणि अन्य.
-------
जलस्रोत बळकटीकरण, शाश्वतीकरणाची गरज
विजय सोळंखी; जलजीवन मिशन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः दूषित आणि प्रदुषणापासून जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरणांची गरज आहे. हा उद्देश २०१९ पासून राबवण्यात येत आहे. हा उपक्रम पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिवर्तनकारी निर्णय आहे. या माध्यमातून ग्रामीण समुदायांमध्ये सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी चालना दिली जात आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूवैज्ञानिक विजय सोळंखी यांनी केले.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीत आयोजित दोनदिवसीय अनिवासी प्रशिक्षण आणि पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये आयोजित कार्यशाळेत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येकी पाच प्रतिनिधींचा समावेश आहे. या वेळी प्रकल्प संचालक राहूल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सोळंखी म्हणाले, जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तीक कार्यात्मक घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा भाग आहे. त्या अनुषंगाने स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण हे प्रशिक्षण समुदाय संचलित दृष्टिकोनावर भर देत असून, त्यामध्ये ग्रामपंचायती, ग्राम पाणी व स्वच्छता समितीमधील ५ प्रतिनिधींना भूजल शोधपद्धती तंत्रे, समुदाय संचलित भूजल व्यवस्थापन नियोजन, भूजल पुनर्भरणांची तंत्रे, भूपृष्ठावरील पाण्याची पुनर्भरण पद्धती, भूजल पुनर्भरणाच्या नदी, नाले तंत्रे या विषयावर तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला डॉ. ठाकूर देसाई, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पांडुरंग पिसाळ, आण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे गुणवंत महाजन, प्रा. अनिरूद्ध पळणीकर, प्रवीण प्रशिक्षक म्हणून मंगेश नेवगे, वैष्णवी गुरव, हर्षदा वाळके हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्य संसाधन केंद्र, जेपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT