कोकण

डीएमडी आजारग्रस्त मुलाची दहावीतील यशकथा

CD

विधायक---लोगो
-rat१४p१५.jpg-
२५N६३७२१
रत्नागिरी : क्षितिज रहाळकरसह आई गौरी व वडील गिरीश.
------------
डीएमडीवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यश
क्षितिज रहाळकर ; ६८ टक्के, आई-वडील, शाळेचे भक्कम पाठबळ
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : ड्युकेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) या आजाराने ग्रस्त असूनही फक्त आणि फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती, आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा आणि शाळा, संस्थेच्या पूर्ण सहकार्यामुळे दहावीच्या परीक्षेत क्षितिज रहाळकर याने ६८.६० टक्के गुण मिळवत यश मिळवले. मर्यांदांच्या पलीकडे जाऊन ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचेच, असा दृढ निश्चय केल्यामुळेच त्याने बाजी मारली.
नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या शाळेत बालवाडीपासून शिकणाऱ्या क्षितिजने सीबीएसईची कठीणतम असणारी दहावीची परीक्षा दिली. क्षितिजला रायटर म्हणून सृष्टी कोकरे हिने काम पाहिले. परीक्षेत क्षितिज तिला प्रश्नांची उत्तरे सांगत होता व ती लिहित होती. नाचणे पॉवरहाऊसनजीक क्षितिजच्या घरी भेट दिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी व क्षितिजने हा सारा प्रवास उलगडून सांगितला. क्षितिजला वयाच्या चौथ्या वर्षापासून डीएमडी आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर नियमित औषोधोपचार, दररोज फिजिओथेरपी, पोहणे अशा व्यायामाद्वारे त्याने दहावीपर्यंतचा पल्ला गाठला. तो नवनिर्माण शाळेत लहानपणापासून शिकत असल्याने त्याला शाळा, वर्गशिक्षिका, वर्गातील मुले, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याने त्याचे शिक्षण आनंददायी झाले. अगदी मोठ्या वर्गातील मुलेसुद्धा त्याला उचलून वर्गात नेत होते. शाळेने त्याला सामावून घेतले. या वाटचालीत प्राचार्य अरविंद पाटील, सोनाली मसुरकर, नाझिया, अल्मास लांबे, गौरव गोसावी यांनी परिश्रम घेतले.
क्षितिजला नेहमी वर्षातून दोनवेळा मुंबईत तपासणीसाठी न्यावे लागते. तिथे न्युरोपेडिअॅट्रिक डॉ. हेगडे यांच्यासह किमान सहा तज्ज्ञ डॉक्टर्स त्याची तपासणी करतात. आई-वडिलांनी क्षितिजसाठी खूप काही केले आहे. क्षितिज दोन वर्षे बुद्धिबळाच्या क्लासलाही जात होता. ऑटोमोबाईलमध्ये त्याला विशेष रूची आहे; परंतु पुढे नेमके कोणते शिक्षण घ्यायचे, याबाबत ते विचार करत आहेत.
-----
डीएमडी आजार म्हणजे काय
डीएमडी हा अनुवंषिक आजार आहे ज्यामुळे स्नायूंना कमकुवतपणा येतो आणि हळूहळू ते कमजोर होतात. स्नायूंच्या पेशींमध्ये ‘डिस्ट्रोफिन’ नावाचे प्रोटिन कमी प्रमाणात किंवा तयार होत नाही. क्षितिज काही वर्षांपूर्वी घरातच पडल्यामुळे तेव्हापासून त्याला व्हीलचेअरवरूनच प्रवास करावा लागतोय.
--
गणितातही चांगले गुण
डीएमडी आजारपणामुळे एखादे गणित सोडवताना त्याच्या पायऱ्या विसरण्याची शक्यता असते; परंतु क्षितिजला माधवी ओक- नाटेकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्या घरी येऊन गणित शिकवत होत्या शिवाय वर्गातही चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याला गणितात ५२ गुण मिळाले आहेत.
--------
चौकट ३
शाळेचे पूर्ण सहकार्य
नवनिर्माण हाय या शाळेने क्षितिजला सर्वतोपरी सहकार्य केले. नवनिर्माण सांस्कृतिक महोत्सवात त्याने व्हीलचेअरसह रंगमंचावर जाऊन भाषण केले. त्या वेळी त्याला खूपच आनंद झाला होता. सर्व मुलांसाठी तो एक जिगरबाज, महत्वाकांक्षी आयकॅान होता.
--------
कोट
नवनिर्माण हायस्कूलच्या दीर्घ परंपरेत सुवर्णाक्षरांनी नोंदवावा, असा आनंद क्षितिज रहाळकर याच्या अभूतपूर्व जिद्द आणि परिश्रमाने मिळवलेल्या यशात आहे. जीवनमरणाच्या एका माहिती असणाऱ्या अदृश्य रेषेवर क्षितिजचे हे यश विलक्षण रोमांचित करणारे आहे. या यशस्वीतेत त्याची आई गौरी रहाळकर यांचे योगदान फार मोठे आणि आजच्या पालकांसाठी एक आदर्श आहे.
--सीमा हेगशेट्ये, संचालिका, नवनिर्माण हाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: ''कटकारस्थान'', भाजप आमदाराने फडकावला उलटा तिरंगा; कोण आहेत संजय पाठक?

Neeraj Chopra Wife: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची पत्नी हिमानीने घेतला धाडसी निर्णय; दीड कोटींचं पॅकेज नाकारलं अन् टेनिसलाही अलविदा, कारण आता...

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

AUS vs SA 3rd T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या 'विचित्र' शॉटने बदलले मॅचचे चित्र! ऑस्ट्रेलियाने थरारक विजयासह जिंकली मालिका Video Viral

Crime: धक्कादायक! २८ वर्षीय तरुणीचे अल्पवयीन मुलावर प्रेम जडले, घरातून पळवून नेलं अन्...; नंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT