कोकण

शीळ धरणातील पाणी १० जूनपर्यंत पुरेल

CD

शीळ धरणातील पाणी १० जूनपर्यंत पुरणार
रत्नागिरीत फक्त सोमवारीच कपात ; साठा पाहून पुढील निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे. मात्र उच्चतम तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. नागरिकांनी गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तरी आठवड्यानून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरु असल्याचे रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला करण्यात येत होता. मात्र यावर्षी धराणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध साठा पाहून कपातीचा निर्णय घेण्यात येईल, मात्र कपात मोठ्या प्रमाणावर केली जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पाणी सोडण्यासाठी विविध प्रभागात २१ लाइनमन कार्यरत आहेत. १५ जण देखभाल दुरुस्तीचे काम पहात आहेत. शहरात अद्याप दीड तास पाणी पुरवठा केला जात आहे. फक्त सोमवारी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे.
---
कोट
मान्सून लांबल्यास पाण्याची कपात विचाराधीन मॉन्सून लांबल्यास नागरिकांना पाण्याची झळ बसू नये, यासाठी सध्याच्या पाणीपुरवठ्यात दहा मिनिटांची कपात करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.
--वैभव गारवे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT