कोकण

उक्षी येथे कौटुंबिक कथेवर आधारीत ''आघात'' चा प्रयोग

CD

rat१५p८.jpg-
P२५N६३८९२
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील उक्षी येथे गौतम बुद्ध जयंतीनिमित्त रंगलेल्या आघात या नाटकातील एक क्षण.
-----
कौटुंबिक कथेवर आधारित ‘आघात’चा प्रयोग
उक्षी येथे अमर भीम नाट्य निकेतनचा उपक्रम; रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः संगमेश्वर तालुक्यातील उक्षी बौद्धजन उत्कर्ष मंडळ व अमर भीम नाट्य निकेतन यांच्यातर्फे जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विद्याधर शिवणकर लिखित व समीर पेणकर दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘आघात’ रंगतदार झाले. कौटुंबिक कथेतून रंगत जाणाऱ्या या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सोमवारी (ता. १२) उक्षी येथे भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नाट्यप्रेमी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. उच्चभ्रू देशपांडे घराण्यातील कुटुंबप्रमुख कुमार देशपांडे यांनी घराण्याचं नावलौकिक व्हावे, असे साम्राज्य उभे केलेले असते. त्यांना दोन मुलं असतात. मुलाचे लग्न होते आणि घरात सून येते. चांगले दिवस सुरू असतात; मात्र त्यांच्या कंपनीत कामाला असलेला मुलगा त्यांच्या मुलीवर प्रेम करत असतो. तो कामातही चाणाक्ष असतो. त्याच्यामुळे खूप टेंडरही कंपनीला मिळत असतात; पण कुमार देशपांडेच्या संशयी वृत्तीमुळे त्याला कामावरून काढून टाकतात. सर्व व्यवस्थित चालले असताना कुमारचा चुलत भाऊ अमर यांच्या आई-वडिलांचे कुमारने हाल केलेले असतात. अमरच्या आई-वडिलांचा मृत्यू होतो. पुढे अमर कुमार देशपांडेला धडा शिकवण्याचे ठरवतो. त्याची संपत्ती, कंपनीला मिळालेली टेंडर आपल्याकडे वळवतो. यामुळे कुमारला कफल्लक करतो. त्याच्याकडे स्वतःचं राहातं घरही नाही. तसेच कुमारची मुलगी भाऊ अमरबरोबर घरातून निघून जाते. घरदार गेल्यावर अमर घरात येतो. कुमारला जुन्या आठवणी सांगतो. आई-वडिलांच्या केलेल्या छळाची आठवण करून देतो. अमर हा आपलाच भाऊ आहे, याची खात्री कुमारला पटते. अमर घरसंपत्ती त्याला परत करतो आणि निघून जातो. अशी कथा या आघात या नाटकाची आहे. या नाटकात अमर भीम नाट्य निकेतनचे कलाकार नितीन जाधव, श्रेयश जाधव, अमेश कांबळे, दिनेश जाधव, दीपक जाधव, संदेश जाधव, श्वेता जाधव, अभिराज जाधव आणि अक्षता सामंत यांनी भूमिका साकारल्या होत्या. या नाटकासाठी संगीत गौरव सातपुते, ध्वनी संयोजन बबलू सोनार, नेपथ्य गणेश साईलकर, प्रकाशयोजना सूरज सावरकर यांनी केली. उत्तम अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत यात रंगलेल्या या नाटकाचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Maharashtra Education: शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होतेय खिचडी; एकच शिक्षक शिकवताहेत दोन-तीन विषय, भरती ठप्प झाल्याचा परिणाम

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ८४ हजार बहिणी अपात्र'; चुकीच्या पद्धतीने घेतला १५१ कोटींचा लाभ, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT