कोकण

-वडिलांच्या निधनानंतरही परीक्षा देत मिळवून उतुंग यश

CD

- ratchl१५३.jpg-
२५N६३९८३
साईराज गुढेकर
-----
वडिलांच्या निधनानंतरही परीक्षा देत उत्तुंग यश
साईराज गुढेकरचे कौतुक; आईच्या डोळ्यात आनंद अश्रू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : कर्करोगाशी झूंज देणाऱ्या वडिलांचे छत्र दहावीचे पेपर सुरू असतानाच हरपलं अन्‌ आभाळाएवढं दु:ख गिळत तो मोठ्या हिंमतीने परीक्षेला सामोरा गेला. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याने अभूतपूर्व यश संपादन करत आपल्या वडिलांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावणाऱ्या साईराज गुढेकर या विद्यार्थ्याने आपल्या कौटुंबिक कठीण प्रसंगातूनही सावरत चक्क ९७.४० टक्के गुण मिळवले. निकाल घेऊन घरी आलेल्या साईराजला पाहताच आईचा अश्रूंचा बांध फुटला.
साईराज हा लहानपणापासूनच हुशार आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने यश मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली होती तसेच नववीमध्ये घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत त्याने लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन प्रॅक्टिकल परीक्षेस बसण्यास तो पात्र झाला होता. २०२४ मध्ये बुद्धिबळ शालांतर खेळामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेचाही त्याला १०वीच्या गुणामध्ये फायदा झाला.
साईराजची दहावीची परीक्षा चालू असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. तरीही त्याने चिकाटीने अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता ९७.४० टक्के मिळवून शाळेत दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला. त्याच्या यशामध्ये त्याची आई वीणा गुढेकर, वडील (कै.) विजय गुढेकर, शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे. वडिलांप्रमाणेच त्याचेही अभियंता होण्याचे स्वप्न आहे. त्याला विज्ञान विषयाची खूप आवड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT