कोकण

स्वामी समर्थ केंद्राचा सोमवारी वर्धापन दिन

CD

स्वामी समर्थ केंद्राचा
सोमवारी वर्धापन दिन
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा २६ वा वर्धापन दिन सोमवारी (ता. १९) साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ला सकाळी ७ वाजता श्री स्वामींवर पूजा, अभिषेक केला जाईल. ८ वाजता भूपाळी आरती, सकाळी ८.३० ते १० यावेळेत श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, सकाळी ११ ते १२.३० यावेळेत स्वामी याग, दुपारी १२.३० ते २ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. त्यानंतर दुपारी २ ते ६ यावेळेत सेवेकऱ्यांना आलेले अनुभव कथन करतील. सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती होईल.

खेड-दापोली
रस्त्याबाबत बैठक
खेड ः खेड नगरपालिका हद्दीतील खेड-दापोली राज्य रस्ता बांधणी आणि पाणी पुरवठा या विषयावर गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेड पालिकेच्या सभागृहात बैठक झाली. त्यांनी रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत अधिकारी व नागरिकांसोबत चर्चा केली. बैठकीत भरणे नाका ते डेंटल कॉलेज आणि वाकवली ते दापोली परिसरातील मुख्य रस्त्याच्या बांधकामाचा आढावा योगेश कदम यांनी घेतला. रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बीए योगशास्त्रसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्यन उपकेंद्रात बी. ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाकरिता पात्रता इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण व समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्ष आहे. नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित तसेच योग ग्रंथांचे शास्त्रशुद्ध मराठी भाषेतून अध्यापन केले जाते. विविध योगसंस्था व शैक्षणिक संस्थांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळते. या अभ्यासक्रमातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये योगशिक्षक, प्राध्यापक, तसेच व्यायामशाळा, योग संस्थांमध्ये योग प्रशिक्षक होऊ शकता. अधिक माहितीसाठी रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला, मध्यवर्ती एसटी बसस्थानकासमोर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Interest Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMIवर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार?

VIDEO : पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यातून नवजात बाळाला डोक्यावर घेऊन निघाले आई-वडील...लोक म्हणाले कृष्णजन्माचा प्रसंग आठवला

Shravan Month 2025: कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी, भोसलेकालीन रघुराजेश्वर शिवमंदिरात पंचरंगी छटेचे शिवलिंग

Latest Marathi News Updates Live : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मंत्रीपद सोडलं पण बंगला सोडवेना, दंड ४२ लाखांवर; मंत्री भुजबळ वेटिंगवर

SCROLL FOR NEXT