कोकण

कनिष्ठ लिपिक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे

CD

64424

कनिष्ठ लिपिक भरतीमध्ये
स्थानिकांना प्राधान्य द्यावे

कोटकामतेवासीयांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १७ ः कोटकामते (ता. देवगड) येथील श्री भगवती माध्यमिक विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी चालू असलेल्या भरती प्रक्रियेत गावातील स्थानिक, पात्र व सुशिक्षित उमेदवारास प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्याकडे केली आहे.
कोटकामते येथील माध्यमिक विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात ग्रामस्थांनी एक निवेदन विद्यालयाचे मुख्याध्यापक व अध्यक्ष यांना दिले. या निवेदनावर एकूण ८५ ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी सरपंच ऋतुजा खाजणवाडकर, उपसरपंच गणेश घाडी, माजी उपसरपंच विजय कुडपकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘गावातील उमेदवार आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता असलेले, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय आहेत. गावाच्या विकासात स्थानिक युवकांचा सहभाग वाढावा व रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी स्थानिक उमेदवारास संधी देणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर

Latest Marathi News Updates : गुजरातमध्ये भीषण अपघात, ७ जणांचा होरपळून मृत्यू

Crime: महाराष्ट्र हादरला! एकामागून एक ४ मुलांना विहिरीत फेकलं, वडिलांचं धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर

SCROLL FOR NEXT