कोकण

शैक्षणिक सहकार्यासाठी नेहमीच तत्पर

CD

swt203.jpg
65025
कुडाळः बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेतर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मुकेश मेश्राम, ब्रजेश मल्लिक, राकेश कुमार, श्री. वराडे, राजू पाटणकर, श्री. परभणीकर आदींसह पालक वर्ग. (छायाचित्र ः अजय सावंत)

शैक्षणिक सहकार्यासाठी नेहमीच तत्पर
मुकेश मेश्रामः कुडाळात बॅंक ऑफ इंडियातर्फे गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः दहावी परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केलेल्या कुडाळ हायस्कूलच्या गुणवंत ‘स्टार्स’ना बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या वतीने आज सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात मदतीसाठी बँक ऑफ इंडियाचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे (एलडीएम) मुकेश मेश्राम यांनी आज गुणवंत गौरव सोहळ्याप्रसंगी केले.
बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या वतीने दहावी परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे मुकेश मेश्राम, मुख्य प्रबंधक ब्रजेश मल्लिक, राकेश कुमार, बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखाधिकारी ऋषिकेश गावडे, पुष्कर फुलपगारे, मुख्याध्यापक व्ही. एम. वराडे, वरिष्ठ प्रबंधक राजाराम परब, राजू पाटणकर, धैर्यशील परभणीकर, ममता पाटणकर, विनोद कडूलकर, भास्कर सावंत, गुणवंत विद्यार्थी स्मितेश कडुलकर, रिया पाटणकर, निधी सावंत आदी उपस्थित होते.
श्री. मेश्राम म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ज्या मार्गदर्शनाची गरज आहे, ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे गुणवंत विद्यार्थी उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वाटचाल करताना त्यांनी नवनवीन क्षेत्र निवडावी व यश संपादन करावे. विद्यार्थ्यांना भविष्यात पुढील शिक्षणासाठी बँक ऑफ इंडियाचे नेहमीच शैक्षणिक मदतीसाठी सहकार्य राहील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा आमचा दूरदृष्टीकोन कायम राहील."
ऋषिकेश गावडे यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अव्वल ठरलेला आहे. कोकण बोर्डात येथील विद्यार्थ्यांनी यशाची कमान सातत्याने टिकवून ठेवलेली आहे. भविष्याकडे वाटचाल करताना ध्येय निश्चित करा, असे आवाहन केले. ब्रजेश मल्लिक यांनी विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांबरोबरच आई-वडिलांचे योगदान आहे. जे तुम्ही क्षेत्र निवडाल, त्या क्षेत्रात जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी व्हा, असे सांगितले. कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक वराडे यांनी, बँक ऑफ इंडियाने केलेला हा सन्मान आहे हे विद्यार्थी व पालकांना प्रेरणा देणारा आहे, असे गौरवोद्गार काढले. राकेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन धैर्यशील परभणीकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT