कोकण

रत्नागिरी ः सर्व ऋतुंमध्ये क्रिकेट टर्फचा लाभ घ्यावा

CD

rat23p3.jpg-
65741
रत्नागिरीः मुख्य प्रशिक्षक लक्ष्मीकांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराच्या समारोपावेळी अर्जुन गद्रे व तळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सर्व ऋतूंमध्ये क्रिकेट टर्फचा लाभ घ्यावा
अर्जुन गद्रे; उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण असेच सुरू ठेवावे. सर्व ऋतूंमध्ये खेळण्यासाठी वापरता येईल, असे सुसज्ज इनडोअर क्रिकेट टर्फचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे यांनी केले.
गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रा. लि आणि रत्नागिरी जेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील कसोप येथील सर्वंकष विद्यामंदिरात आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराच्या सांगता कार्यक्रमावेळी ते बोलत होते. उन्हाळी क्रिकेट शिबिर २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत घेण्यात आले. या शिबिरामध्ये ६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. शिबिरादरम्यान क्रिकेट खेळातील बारकावे, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आवश्यक सराव यासोबतच शारीरिक तंदुरुस्ती याकडेही प्रशिक्षकांनी बारकाईने लक्ष दिले.
शिबिरामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना त्यांच्या क्षमता, त्यांच्या उणीवा जाणून घेऊन वैयक्तीक मार्गदर्शन देण्यात आले. प्रत्येक खेळाडूच्या गरजा समजून घेऊन त्यांना शिबिरातून ते देण्याचा प्रयत्न करण्यात आला. १० वर्षांच्या लहानात लहान खेळाडूंपासून १८ वर्षांपर्यंतच्या मोठ्या मुलांचा या शिबिरामध्ये सहभाग होता. त्यामुळे क्रिक्रेटच्या सरावाबरोबरच सांघिक जबाबदाऱ्या, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावनादेखील या मुलांमध्ये निर्माण झाली. महिनाभर चाललेल्या या शिबिराची सांगता करण्यात आली.
या वेळी गद्रे मरिनचे व्यवस्थापकीय संचालक गद्रे यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. या वेळी गद्रे मरिनचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर अभिजित तळेकर, जेट्स रत्नागिरीचे अमित, सर्वंकष विद्यामंदिरचे नवीन सावंत, अॅडमिनिस्ट्रेटर राधा करमरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT