कोकण

कुडाळ येथील क्रीडांगणाचा नवा आराखडा तयार करा

CD

65782

कुडाळ येथील क्रीडांगणाचा
नवा आराखडा तयार करा

नीलेश राणे ः क्रीडा विभागाला सूचना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः येथील क्रीडांगणाचा नव्याने आराखडा तयार करा, अशा सूचना आमदार नीलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. या आराखड्यात अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा, असेही त्यांनी सांगितले.
कुडाळ तालुका क्रीडा विभागाची बैठक तहसील कार्यालय येथे आमदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कार्याध्यक्ष तहसीलदार वीरसिंग वसावे, सचिव तथा क्रीडा अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील तसेच जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, काका कुडाळकर, बाबा परब, दादा साईल आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी आढावा घेऊन शहरामध्ये असलेले क्रीडांगण कशा प्रकारे विकसित करता येईल० यावर लक्ष वेधले. या क्रीडांगणासाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे यासाठी नव्याने आराखडा तयार करा आणि मला दाखवा. त्यामध्ये आधुनिक पद्धतीचे क्रीडांगण व त्यामधील सुविधा असल्या पाहिजे, अशा सूचना क्रीडा अधिकारी शिंदे यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

IND vs ZIM 2nd T20I : फक्त ४ धावा अन् तिलक वर्मा जाऊन बसला रोहित शर्मा, विराट कोहलीसह 'त्या' ८ जणांच्या स्पेशल लिस्टमध्ये

SCROLL FOR NEXT