कोकण

चिपळूण-कुटरेत नदीतील तात्पुरता भराव गेला वाहून

CD

rat23p19.jpg-
65819
चिपळूण ः कुटरे येथे नदीत तात्पुरता तयार केलेला रस्ता जोरदार पावसात वाहून गेला आहे.
rat23p20.jpg-
65820
चिपळूण ः कुटरे येथे बांधण्यात आलेल्या पुलाला जोडरस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
-----------

कुटरेत नदीतील तात्पुरता भराव गेला वाहून
ग्रामस्थांचे हाल; नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम रखडले
सकाळ
चिपळूण, ता. २३ ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने चिपळूण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसात कुटरे जांभी नदीवरील पुलाच्या बाजूने नदीमधून तात्पुरता भराव केलेला रस्ता वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसला आहे.
या पावसामुळे सर्वसामान्यांची कामे रेंगाळली आहेत. चिपळूण शहरात महामार्गावर काहींच्या घरात पाणी शिरल्याचे पाहावयास मिळाले. चिपळूणमध्ये अल्ताफ नाईक यांच्या घरावर वीज कोसळून घराचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागांत पुलांसह रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये कुटरे येथे सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने नदीत रस्त्यासाठी केलेला भराव वाहून गेला आहे. याचा फटका कुटरे गावातील खालचीपेठ, तांबडवाडी, चिंचवाडी, होडेवाडी, शिर्केवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना बसला असून, असुर्डे व सावर्डे येथे जाणेदेखील अवघड झाले आहे. तसेच तळवडे, गोवळ, पाते येथील ग्रामस्थांनादेखील ये-जा करण्याच्यादृष्टीने अडचणीचे झाले आहे. पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेला रस्ता पावसामुळे नदीतील पाणी वाढल्याने वाहून गेल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे; परंतु आता अडकलेले ग्रामस्थ एकमेकांना हात देऊन सुरक्षितस्थळी जात आहेत.
दरम्यान, सकाळी १२ च्या सुमारास रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू होते. पुलाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र जोडरस्ता मार्गी लागलेला नाही. त्यातच जोरदार पाऊस झाल्याने नदीतील रस्ता वाहून गेला. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT