कोकण

मंडणगड-मंडणगडमध्ये शाळेजवळील संरक्षण भिंत कोसळली

CD

-rat23p26.jpg
65859
गांधी चौक ः शाळेजवळ पहिल्याच पावसात भिंत कोसळून नुकसान झाले.

मंडणगडमध्ये शाळेजवळील
संरक्षक भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ ः मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गांधी चौकातील मराठी शाळेजवळील संरक्षक भिंत गुरुवारी (ता. २२) कोसळली. विशेष म्हणजे या भिंतीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वीच केले होते. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नगरपंचायतीच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवणे, तसेच सहाय्य योजना या योजनेच्या माध्यमातून मराठी शाळेजवळ जांभ्या दगडातून संरक्षक भिंतीची निर्मिती करण्यात आली होती. या कामासाठी ६ लाख ४६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता; मात्र केवळ सहा महिन्यांतच ही भिंत कोसळल्याने भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत येथील रहिवासी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. शाळा सुरू झाल्यावर मुलांना, शाळा व्यवस्थापनास या पडलेल्या भिंतीमुळे त्रास होऊ शकतो. या कामासंदर्भात नगरपंचायतीने योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT