कोकण

महिलांनी उद्योजकतेत भरारी घ्यावी

CD

65991

महिलांनी उद्योजकतेत भरारी घ्यावी

नीलेश वालावलकर ः कुडाळात सिंधुकन्या प्रभाग संघाची वार्षिक सभा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः उमेद अभियान ही एक चळवळ बनली पाहिजे. भविष्यात याच उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला उद्योजिका पुढे आल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा व्यवस्थापक नीलेश वालावलकर यांनी सिंधुकन्या प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेत केले. या सभेतील ५०० हून अधिक उपस्थित महिलांना काजू रोप वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधुकन्या प्रभाग संघ पिंगुळीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील रवी कमल हॉल येथे झाली. या सभेचे उद्‍घाटन प्रभाग संघाचे अध्यक्ष साधना माडये यांच्या हस्ते झाले. यावेळी कुडाळ तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, कुडाळ पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, पोलिस हवालदार कृष्णा परुळेकर, बँक ऑफ इंडिया पिंगुळी शाखा व्यवस्थापक चैताली प्रभू, सचिन मसूरकर, उत्कर्ष सुवासकर, प्रभाग संघ अध्यक्ष साधना माडये, कोषाध्यक्ष साक्षी कविटकर, सचिव कांचन नायर, प्रभाग समन्वयक सुप्रिया वालावलकर, ज्योत्स्ना जाधव, सोनाली देशपांडे, पूजा वरस्कर, सीमा नाईक, वीणा वारंग, सिद्धाली शेटकर तसेच सिंधुकन्या प्रभाग संघातील पिंगुळी, साळगाव, मांडकुली, मुळदे, तुळसुली, भोयाचे केरवडे या सहा ग्रामपंचायत अंतर्गत बारा महसुली गावातील सीआरपी, महिला उपस्थित होत्या.
श्री. शेगडे यांनी दामिनी पथक, सायबर गुन्हे तसेच ११२ याबाबत माहिती दिली. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. प्रत्येकाने मोबाईलवरून होणाऱ्या फसवणुकींबाबत सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉलेज, हायस्कूल या ठिकाणी होणारी मुलींची छेडछाड थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यरत असणार असल्याचे सांगितले. श्री. प्रभू यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सहकार्याची ग्वाही दिली. साधना माडये यांनी प्रभाग संघाच्या कार्याचा धावता आढावा घेतला. विणा वारंग यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया वालावलकर यांनी आभार मानले.
--------
प्रभाग संघाचे आदर्शवत काम!
श्री. वालावलकर म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभाग संघाचे आदर्शवत काम सुरू आहे. हे काम अधिक जोमाने होण्यासाठी सर्व महिलांचा यामध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्गातील प्रभाग संघांची कामगिरी पाहायला बाहेरची माणसे येतात. हे अभियान प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी सर्वसाधारण सभा फार महत्त्वाची आहे. या सभेमध्ये उपस्थित प्रश्नांकडे सर्व महिलांनी लक्ष देऊन भविष्यात काय करता येईल, या दृष्‍टिकोनातून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात नोकरी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे शेतीवर व्यवसाय असतील आणि त्यावरच आपण टिकू शकतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि भविष्यात उद्योजिका म्हणून पुढे या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT