कोकण

खारेपाटणमध्ये तिरंगा रॅलीस प्रतिसाद

CD

65997

खारेपाटणमध्ये तिरंगा रॅलीस प्रतिसाद

घोषणांनी परिसर दणाणला; नागरिकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशवाद्यांविरोधात लढाई करून आपली ताकद जगाला दाखवून दिली. भारतीय सैनिकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (ता. २३) खारेपाटणवासीयांतर्फे तिरंगा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, विविध पदाधिकारी, शिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.
ही रॅली खारेपाटण हायस्कूल ते बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, संतोष पाटणकर, रवींद्र मांजरेकर, खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक संतोष राऊत, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वसीम सय्यद, लिपिक अनिल करंगुटकर, चिंचवली सरपंच अशोक पाटील, अरुण कर्ले, सुहास राऊत, रामा पांचाळ, डॉ. उमेश बालन, डॉ. बलराज येळकोटे, डॉ. संतोष वडाम, महिला बचतगटाच्या जागृती पोटले, आस्था पाटणकर, सायली तुरळकर, पांडुरंग कोकरे, राकेश राऊत, राजू ठाकूर-देसाई आदी उपस्थित होते.
या रॅलीमध्ये ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. रमाकांत राऊत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

ट्रेन बुकिंग बनले आणखी सोपे! Cleartrip आणि IRCTC ची पार्टनरशिप; पाहा तिकीट कसं मिळवायचं? एका क्लिकमध्ये

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

SCROLL FOR NEXT