कोकण

देवगड तालुक्यात संततधार कायम

CD

66033
देवगड तालुक्यात संततधार कायम

किनारी भागात जोर; हुर्शीत गोठा कोसळून ४० हजारांची हानी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः तालुक्याच्या किनारी भागात वादळी वाऱ्या‍सह पावसाचा जोर सुरूच आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानसत्रही सुरू आहे. हुर्शी गडदेवाडी (ता. देवगड) येथील एक गोठा कोसळून सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. किनारी भागात पावसाची झोड सुरूच असून, चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे १०२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३२७ मिलिमीटर इतका पूर्वमोसमी पाऊस झाला आहे.
तालुक्याच्या किनारी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. किनारी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. सततच्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानीचे सत्र सुरू आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेले चार दिवस किनारी भागात पावसाची संततधार कायम आहे. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील हुर्शी गडदेवाडी येथील एक गोठा कोसळून त्यात सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली. तालुक्याच्या किनारी भागाला पाऊस चांगलाच झोडपून काढत असून, आज सकाळपर्यंत येथे १०२ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येत्या काळात किनारी भागात जोरदार वारा आणि विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पावसामुळे शहराचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. पावसातही महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

SCROLL FOR NEXT