कोकण

-पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

CD

पायाची ‘सांधेरोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश संपादन केले. डॉक्टरांच्या पथकाने रंजना जोशी (वय ६८) यांच्यावर पायाची यशस्वी कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया केली.
जोशी यांना गेल्या १५ वर्षापासून वातामुळे गुढघेदुखीचा त्रास होता. तसेच दोन्ही पायांना बाक असल्यामुळे उभे राहणे व आधाराशिवाय चालता येणे शक्य नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी डाव्या पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली होती. त्यानंतर १७ मे २०२५ ला उजव्या पायाचीदेखील कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी संबंधित रुग्णास चालणे-फिरणे शक्य झाले. तसेच पायाचा बाक नाहीसा झाल्यामुळे चालणे अगदी सुलभ झाले. दोन्ही पायाची किचकट व खर्चिक अशी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया पार पडली. जोशी यांनी रुग्णालयात मिळालेल्या योग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 11 वाजता जाहीर होणार

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT