कोकण

पावस-गोळपमध्ये बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळली

CD

-rat२४p१३.jpg
66024
पावस ः गोळप येथील बौद्धविहाराची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली.

गोळपमध्ये बौद्धविहाराची
संरक्षक भिंत कोसळली

५० हजारांचे नुकसान; पावस पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

पावस, ता. २४ ः गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पावस पंचक्रोशीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. रत्नागिरी तालुक्यातील गोळप-बौद्धवाडी येथील बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळली असून, त्याचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोळप बौद्धविहारची इमारत बांधण्यात आली. त्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीजवळ गटार असल्यामुळे पावसामुळे भेगा गेल्यामुळे दिवसभर सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील संरक्षक भिंत अचानकपणे पडली. त्यामुळे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. भिंत पडल्यानंतर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पावस, फणसोप, नाखरे, पूर्णगड, गणेशगुळे, निरूळ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
--------
चौकट
रत्नागिरी तालुक्यात ५९ मि.मी. पाऊस
रत्नागिरी तालुक्यातील नऊ मंडलांमध्ये सरासरी ५९ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. यामध्ये पावस- ६८, जयगड- ५०, मालगुंड- ४२, खेडशी- ६७, रत्नागिरी- ६८, तरवळ- ७२, फणसोप- ६५, पाली- ५८, कोतवडे- ४९ इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT