कोकण

मत्स्य महाविद्यालयात कायदेविषयक कार्यक्रमाला प्रतिसाद

CD

-rat२४p१२.jpg-
२५N६६०२३
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव.
------
मत्स्य महाविद्यालयात कायदेविषयक जागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याकरिता कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मत्स्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
या वेळी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लोकअभिरक्षक ॲड. अजित वायकूळ यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा उदाहरणासह कायदा समजावून सांगितला. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधिज्ञ अमित शिरगावकर यांनी पॉक्सो कायद्याविषयी माहिती दिली. अठरा वर्षाखालील मुलं-मुली यांच्यावर होणाऱ्या अन्यायकारक कृतीविषयी कोणत्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे, असे गुन्हे घडणार नाहीत, याबद्दल कोणती काळजी घ्यावी आणि असे गुन्हे निदर्शनास आल्यास त्या विषयी कोणती कार्यवाही करावी याबद्दल माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांची पत्नी आणि कन्या या वेळी उपस्थित होत्या. मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी आणि कायदा साथी सुरेश पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यासाठी प्राध्यापक डॉ. जयप्पा कोळी, श्रीकांत शारंगधर, डॉ. अजय देसाई, भालचंद्र नाईक यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT